जगद्गुरु संत श्री. तुकोबाराय हे सकल संतांना प्रिय असलेले, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे संत, की ज्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत. ते आपण हजारो जन्मातही फेडू शकत नाही. या ऋणातून अंशत: उतराई होण्याची सुवर्ण संधी गाथा मंदिराच्या रुपाने आपणास प्राप्त झाली आहे. आता ही सुवर्ण संधी कोणीही दवडू नये. शुद्धव्यवहाराने आपण धनार्जन करावे. व सत्पात्री दान देऊन अक्षय पुण्यप्राप्तीचा मार्ग प्रशस्त करावा. या श्री. तुकोबारायांच्या शिकवणुकीचा आपण अंतर्मुख होऊन विचार करावा.
कारण सत्पात्री दान देणारा हा अधिक धनवान होतो ‘सुपात्रदानाच्च भवेत् धनाढ्य:’ व याच्या उलट कुपात्री दान देणारा दारिद्रयास प्राप्त होतो. ‘कुपात्रदानाच्च भवेत् दरिद्रो’ या शास्त्र वचनानुसार देव-ऋषी-पितृ ऋणातून उतराई होण्यासाठी सकलसमाजउपकारक असलेल्या या महान ऐतिहासिक स्मारकाला उदार अंत:करणाने व सढळ हातांनी मदत करावी. आपल्या या ट्रस्टला ८० जी. चे प्रमाणपत्र कायम स्वरुपी मिळालेले आहे. त्यामुळे ज्यांना आयकर शुल्क भरावे लागत असेल त्यांना आयकर माफीची ८० जी. ची सवलत मिळेल.
तरी भाविकांनी आपल्या या लोकोपकारक उत्तरोत्तर विशाल होत जाणाऱ्या कार्याचे स्वरूप लक्षात घेऊन थोडाही विलंब न करता
१) बांधकाम निधी २) अन्नदान निधी ३) गोशाळा निधी ४) गुरुकुल निधी इत्यादी दानप्रकारात यथाशक्ती भरघोस मदत करुन आपले हे श्रद्धास्थान अखिल विश्वाला नित्य दर्शनीय, पूजनीय, स्मरणीय ठरण्यास मदत करावी ही साग्रह नम्र विनंती.
गाथामंदिर प्रकल्पातील १) बांधकाम निधी २) अन्नदान निधी ३) गोशाळा निधी ४) गुरुकुल निधी या मुख्य चार विभागांसाठी अर्थदान सेवा देणाऱ्या उदार दात्यांची या प्रकारे चिर कृतज्ञता व्यक्त केली जाते.
श्री. तुकोबारायांचे मूळपुरुष महान भगवद्भक्त श्री. विश्वंभरबाबा यांच्या अखंडवारीसेवेने संतुष्ट होऊन भगवान श्री. पांडुरंग देहू क्षेत्री आले त्यामुळे हे क्षेत्र पंढरीसम झाले. तसेच या क्षेत्रात श्री. तुकोबारायांचे उपोषण देवाने अन्नदान करुन सोडवले अशा पंढरीसम क्षेत्री भाविकांस अन्नदान घडविण्यासाठी गाथामंदिरात इ.स. २०१२ च्या चैत्र शु. गुढीपाडव्यापासून उत्कृष्ट सात्विक प्रतीचे अन्नदान सुरु केले आहे. गुरुकुलातील आचारनिष्ठ, साधनानिष्ठ, अभ्यासक, साधक व अतिथि दर्शनार्थी यात्रिक यांच्या सेवेचा हा अन्नप्रसाद दररोज ५०० ते ६०० व सुट्टीच्या दिवशी १००० पर्यंत भाविक भक्तांस दिला जातो.
सर्व प्रकारच्या दानांची अधिकृत पावती दिली जाते. तसेच रोजच्या अन्नदात्यांच्या हस्ते श्री. विठ्ठल रुक्मिणी, श्री. तुकोबाराय, श्री. ज्ञानोबाराय यांचा अभिषेक करुन संकल्पपूर्वक अन्नदान घडविले जाते. व रोजच्या अन्नदात्यांची नावे रोज फलकावर लिहिली जातात.