गाथा मंदिर वेळ - सकाळी ६ ते रात्री ९   |   आरती वेळ: सकाळी ७ वा. , संद्याकाळी ७ वा.   |   गाथा मंदिर गुगल नकाशा   |   देणगी योगदान
संपर्क - +९१ - ९७६३ ६३२०००, +९१ - ७७७४ ०८७६८१ 

धर्मादाय सामाजिक उपक्रम

गाथा मंदिर ट्रस्ट अनेक सेवाभावी उपक्रम राबवत आहे. त्यापैकी काही खाली तपशील देत आहोत.

शारीरिक चिकित्सा व औषधोपचार केन्द्र

अनेक भाविक भक्तांना उद्भवणाऱ्या असाध्य व्याधींच्या निवारणासाठी रोगा ऐशा द्याव्या वल्ली। जाणे झाली बाधा ते।। यानुसार अचूक उपचार करणाऱ्या आयुर्वेदाचार्य डॉ. चंद्रकुमार देशमुख यांच्याकडून दर बुधवारी तपासणी व औषध उपचारांची मोफत सुविधा. गुरुवारी सत्य साई सेवा संघटनेकडून ॲलोपॅथिक चिकित्सा, औषधोपचार मोफत सुविधा तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी ससून हॉस्पिटल सहाय्यातून मोफत नेत्रतपासणी व मोतीबिन्दु शस्त्रक्रिया.