गाथा मंदिरातील तळमजल्यामध्ये श्री. तुकोबारायांचे जन्मापासून तो वैकुंठगमनापर्यंतचे जीवन प्रसंग मूर्तीमय, त्रिमीतीय (3D) स्वरूपात दाखविणे.
जगद्गुरु श्री. तुकोबारायांच्या श्रीमुखातून तसेच चौदा टाळकरी यांच्या वलयात पुढे छत्रपती शिवाजीराजे, अनगडशहा फकीर बसलेले आहेत अशा कीर्तन स्वरूपात मानवता, एकता, जगद्बंधुता, समानता भक्तिमयता इत्यादी सद्विचारांचे दर्शन व श्रवण घडविणे.