गाथा मंदिर वेळ - सकाळी ६ ते रात्री ९   |   आरती वेळ: सकाळी ७ वा. , संद्याकाळी ७ वा.   |   गाथा मंदिर गुगल नकाशा   |   देणगी योगदान
संपर्क - +९१ - ९७६३ ६३२०००, +९१ - ७७७४ ०८७६८१ 

अन्नपूर्णाभवन :

सर्वांभूती द्यावे अन्न। या श्री. तुकोबारायांच्या उपदेशानुसार आलेल्या सर्व भाविकांना माध्यान्ही क्षुधाशांतीचा आनंद देणारे अनेक सुख सुविधांनी युक्त असलेले उत्कृष्ट सात्विक अन्नछत्र, द्रव्य वेचावे अन्न छत्री। या श्री. तुकोबारायांच्या शिकवणुकीचे अनुसरण करत अनेक दानशूर अन्नदात्यांना अक्षय पुण्यप्राप्ती करून देणारे श्री. बहिणाबाई अन्नपूर्णा भवन.

पाकशाळा :

ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक। श्री. तुकोबारायांच्या अविरल अमृत दृष्टीतून सर्व साधक, भाविक, सेवकांसाठी पवित्र भोजन प्रसादाची पाक सिद्धी करणारी व माता अन्नपूर्णेच्या कृपेने सदा संपन्न असलेली, अत्याधुनिक उपकरणांनी युक्त अशी श्री. महालक्ष्मी पाकशाळा.

अन्नदान निधि

तेथे एक शीत दिधल्या अन्न । कोटी कुळाचे होय उद्धरण। कोटी याग केले पूर्ण । ऐसे महिमान ये तीर्थीचे ।।

श्री. तुकोबारायांचे मूळपुरुष महान भगवद्भक्त श्री. विश्वंभरबाबा यांच्या अखंडवारीसेवेने संतुष्ट होऊन भगवान श्री. पांडुरंग देहू क्षेत्री आले त्यामुळे हे क्षेत्र पंढरीसम झाले. तसेच या क्षेत्रात श्री. तुकोबारायांचे उपोषण देवाने अन्नदान करुन सोडवले अशा पंढरीसम क्षेत्री भाविकांस अन्नदान घडविण्यासाठी गाथामंदिरात इ.स. २०१२ च्या चैत्र शु. गुढीपाडव्यापासून उत्कृष्ट सात्विक प्रतीचे अन्नदान सुरु केले आहे. गुरुकुलातील आचारनिष्ठ, साधनानिष्ठ, अभ्यासक, साधक व अतिथि दर्शनार्थी यात्रिक यांच्या सेवेचा हा अन्नप्रसाद दररोज ५०० ते ६०० व सुट्टीच्या दिवशी १००० पर्यंत भाविक भक्तांस दिला जातो.

१) रू. १५,०००/- दिल्यास एक दिवसाचे अन्नदान.

२) रू. १,५०,०००/- दिल्यास कायम स्वरुपीचे दरवर्षी एक दिवसाचे अन्नदान.

३) या व्यतिरिक्त यथा शक्ती धन, धान्य, वस्तू आदि दानही स्वीकारले जाते.

सर्व प्रकारच्या दानांची अधिकृत पावती दिली जाते. तसेच रोजच्या अन्नदात्यांच्या हस्ते श्री. विठ्ठल रुक्मिणी, श्री. तुकोबाराय, श्री. ज्ञानोबाराय यांचा अभिषेक करुन संकल्पपूर्वक अन्नदान घडविले जाते. व रोजच्या अन्नदात्यांची नावे रोज फलकावर लिहिली जातात.

अन्नदान निधि योगदान